Wakad Crime News : सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज : सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. ही घटना 6 डिसेंबर 2019 ते 1 मार्च 2021 या कालावधीत रहाटणी आणि मांजरी बुद्रुक, हडपसर येथे घडली.

पप्पू किसन खलसे (वय 28), बेबी किसन खलसे (वय 55), किसन हरिभाऊ खलसे (वय 60, सर्व रा. मांजरी बुद्रुक, हडपसर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी विवाहितेकडे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी केली. मात्र, ते देण्यास विवाहितेने नकार दिला. त्यानंतर आरोपींनी तिला घरगुती कारणांवरून वारंवार शिवीगाळ व मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.