Wakad Crime News : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जेवण बनवण्याच्या घरगुती कामाच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याबाबत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 फेब्रुवारी 2018 ते 20 एप्रिल 2021 या कालावधीत काळेवाडी येथे घटला.

पती मयुर सावंता माळी (वय 30), सासू, सासरे, मोठी नणंद, लहान नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण बनविण्याच्या तसेच घरगुती कामाच्या कारणांवरून सासरच्या लोकांनी विवाहितेला वारंवार शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच पतीने फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.