BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : हॉटेल चालकाला जीवे मारण्याची धमकी देत मद्यपींनी केली दुचाकीची तोडफोड

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये उशिरापर्यंत मद्यपान करण्यास मज्जाव करणाऱ्या हॉटेल मालकाला चौघा मद्यपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ करत हॉटेल मालकाच्या दुचाकीची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि. 14) रात्री बाराच्या सुमारास डांगे चौक थेरगाव येथे घडली.

सागर संभाजी कांबळे (वय 28, रा. एकता कॉलनी, गणेश नगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शिवराज दशरथ माने (वय 25, रा. तापकीर नगर काळेवाडी), अक्षय सुधीर भोसले (वय 24, रा. पंढरपूर), गणेश अशोक मदने (वय 22, रा माण, मुळशी) यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे डांगे चौक येथील सागर बारमध्ये मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मद्यपान करीत होते. त्यांना तक्रारदार हॉटेल मालक यांनी ‘खूप उशीर झाला आहे, मला हॉटेल बंद करायचे आहे, त्यामुळे तुम्ही उरका’ असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी सागर कांबळे यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या त्यांच्या दुचाकीची तोडफोड केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3