Pune : रिदमिक जिमनॅस्टिक प्रशिक्षण शिबिरात हेवन स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंचा सहभाग

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र मंडळातर्फे पुण्यात अभिरूची मॉल येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक लाला युसीफोवाच्या रिदमीक जिमनॅस्टिक या खेळाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात हेवन स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंनी सहभाग घेतला.

1 मे ते 15 मे दरम्यान या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रमुख प्रशिक्षक युरोपियन स्पर्धा विजेती,अझेरबायजान देशाची लाला युसीफोवा यांनी मार्गदर्शन केले. हेवन स्पोर्टस क्लबच्या अनुष्का लुणावत, अनन्या देव व अनवी पाटील या खेळाडूंनी भाग घेतला.

एकूण १३ दिवसांच्या प्रशिक्षणात रिदमीक जिमनॅस्टिकचे मूलभूत प्रशिक्षण, साहित्य हाताळणी व आवश्यक अश्या व्यायाम प्रकारावर भर दिला गेला. या शिबिरात विविध ठिकाणहुन आलेल्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या शिबिराचे आयोजन निष्ठा शहा यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like