Wakad: घरासमोर पार्क केलेली दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज – घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना वाकड येथे मंगळवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आली.

तुषार अरविंद शेटे (वय 33, रा. कलाटेनगर, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेटे यांनी आपली 30 हजार रुपये किंमतीची एम एच 14 / बी क्‍यू 3257 ही दुचाकी राहत्या घरासमोर मंगळवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास पार्क केली होती. मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांना आपली दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.