Wakad : लाईट बंद करण्यावरुन पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण; पत्नीची पोलिसात फिर्याद

Wakad: Violent quarrels between husband and wife over turning off the lights; Wife's complaint to the police

एमपीसी न्यूज –  लाईट बंद करण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. यामध्ये पतीने पत्नीला मारहाण केली. हा वाद दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी पतीवर गुन्हा नोंदवला आहे. घटना बुधवारी (दि. 6) रात्री नढेनगर काळेवाडी येथे घडली.

याप्रकरणी संबंधित पत्नीने (वय 30) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती (वय 35, रा. नढेनगर, काळेवाडी) याच्यावर असे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री फिर्यादी पत्नी आणि त्यांचे पती यांच्यामध्ये झोपताना लाईट बंद करण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून पतीने पत्नीला यांना हाताने मारहाण केली.

तसेच घरातील कॅरमबोर्ड पत्नीच्या डोक्यात मारला. यामध्ये पत्नी जखमी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा वाद पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी पत्नीच्या दाखल फिर्यादीनुसार याबाबत पतीवर गुन्हा नोंदवला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.