Wakad : विनाकारण एकाला खुर्चीने मारहाण

एमपीसी न्यूज – पानटपरीवर थांबलेल्या व्यक्तीच्या डोक्यात विनाकारण खुर्ची मारली. ही घटना मंगळवारी (दि. 18) सायंकाळी सातच्या सुमारास थेरगाव गुजरनगर येथे घडली.

साईराम सुभाष शिंदे (वय 40, रा. मनपा गार्डनजवळ, गुजरनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साईराम मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास गुजरनगर येथील पानटपरीवर थांबले होते. त्यावेळी अज्ञात आरोपी तिथे आला. त्याने काहीही कारण नसताना प्लास्टिक खुर्ची उचलून साईराम यांच्या डोक्यात मारली. यामध्ये साईराम यांच्या डोक्याला इजा झाली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस हवालदार टिळेकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.