Wakad : किरकोळ कारणावरून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून तिघांनी मिळून तरुणाला घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 21) दुपारी पाचच्या सुमारास काळेवाडी येथे घडली.

संतोष मारुती तिरमखे (वय 28, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आकाश भोसले (रा. पापड गल्ली, काळेवाडी), लखन (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही), जिया शेख (रा. परदेशी चाळ, काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पाचच्या सुमारास फिर्यादी संतोष, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले घरी होते. आरोपी आणि फिर्यादी संतोष यांचा मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला.

या वादातून चिडलेल्या आरोपींनी संतोष यांना घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच आमच्या नादाला लागायचे नाही, अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.