Warje Accident : ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे बेंगलोर महामार्गावर वारजेजवळ (Warje Accident) भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरून चाललेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. संकल्प चव्हाण असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी दुःख बाजूला सारत केले आपले कर्तव्यपालन; जगभरातून होते आहे कौतुक

प्राथमिक माहितीनुसार, संकल्प चव्हाण हा वारजेहून धायरीच्या दिशेने दुचाकीवर जात असताना ट्रकने त्याला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की चव्हाण थेट ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. वारजे पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून (Warje Accident) पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.