Warje Accident : माई मंगेशकर हॉस्पिटलसमोर खडी पसरल्याने अपघात ; 2 दिवसांत डांबरीकरण करा : बाबा धुमाळ

एमपीसी न्यूज – वारजेमध्ये (Warje Accident) माई मंगेशकर हॉस्पिटलसमोरील सर्व्हिस रस्त्यावर खडी पसरल्याने अपघातात वाढ झाली आहे. 2 दिवसांत या रस्त्याचे डांबरीकरण करा, अशी मागणी पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी केली आहे. 
आज राष्ट्रीय महामार्गाचे प्रमुख अधिकारी कदम, तोडकरी, कोळी यांच्या समवेत बाबा धुमाळ यांनी माई मंगेशकर हॉस्पिटल समोरील सर्व्हिस रस्त्याची पाहणी केली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या सर्व्हिस रस्त्यावरील खड्यांमध्ये संबंधित हायवेच्या ठेकेदाराने अनावश्यक डस्ट संपूर्ण रस्त्यावर टाकल्याने काही दुचाकीस्वारांचे गाडी घसरून अपघात झाले. त्यांच्यावर सध्या माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
यामध्ये अनेक महिला व जेष्ठ नागरिकांचे प्रमाण आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार आज आम्ही सर्वजन संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन या रस्त्याची पाहणी केली असता आजच्या आज सदर रस्त्यावरील इस्ट काढून घेण्यात यावी व त्वरित या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली. वारंवार या रस्त्यावर पडणारे बट्टे व अपघात टाळण्यासाठी व्हायोला चौक ते बाएफ संस्था या दरम्यानचा (Warje Accident) रस्ता कॉन्क्रीटचा करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली. परंतु, तोपर्यंत व्हायोला चौक ते बाएफ संस्था दरम्यानचा रस्ता डांबरीकरण करण्यात यावे, तसेच हे डांबरीकरण झाले नाही, दुर्दैवाने जर अपघात झाला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी व ठेकेदाराची असेल असे सांगण्यात आले, अशी माहिती बाबा धुमाळ यांनी दिली.
या पाहणी प्रसंगी निवृत्ती येनपुरे, महादेव गायकवाड, अरुण पाटील, राजेंद्र ढोबळे, भगवान गुंड, नाईक काका व वारजे वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.