Water supply : दिवाळीतही पाणीपुरवठा विस्कळीत; संतप्त माजी नगरसेवकाने दिवाळीभेट म्हणून प्रशासनाला पाठविला मोकळा हंडा

एमपीसी न्यूज – दिघीगाव व उपनगरांममधील विस्कळीत पुरवठ्याकडे लक्ष्य वेधूनही महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ऐन दिवाळीतही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही.(Water supply) त्यामुळे संतप्त झालेले माजी नगरसेवक विकास डोळस यांनी दिवाळीभेट म्हणून महापालिका प्रशासनाला बिनपण्याचा मोकळा हंडा भेट दिला. प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.

याबाबत पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांना निवेदन दिले. माजी नगरसेवक कुंदन गायकवाड उपस्थित होते. निवेदनात माजी नगरसेवक डोळस यांनी म्हटले आहे की, दिघीगाव व उपनगरांमध्ये पाणी समस्या गंभीर होत असल्याबाबत महिन्याभरापूर्वी पत्र दिले होते.(Water supply) तरीही ऐन दिवाळीत अगदी वसुबारसेपासून आजपर्यंत दिघीत पाण्याची समस्या जैसे थे आहे. आयुक्त शेखर सिंह आल्यानंतर पाणीपुरवठा विभाग ढिला आणि गलथान झाला आहे. खूप मेहनतीने प्रभागातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारी शून्यावर आणल्या होत्या. पण, प्रशासकीय राजवटीत प्रभागातील पाणीपुरवठा विस्कळीत करुन प्रशासनाने आमच्या कामावर पाणी फिरवले आहे.

Children drowned : आडगाव येथील बंधाऱ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

माजी लोकप्रतिनिधींसह प्रभागातील नागरिकांची दिवाळी बिनपाण्याची केली. त्यामुळे दिवाळीभेट म्हणून प्रशासनाला नागरिकांच्या वतीने बिनपाण्याचा मोकळा हंडा गिफ्ट बॉक्स मध्ये पॅक करुन भेटवस्तून दिला. या भेट वस्तूचा स्वीकार करुन नागरिकांच्या घरचे हंडे पाण्याने कसे भरता येतील यासाठी प्रयत्न करण्याची विनंती माजी नगरसेवक डोळस यांनी निवेदनातून केली आहे.

याबाबत माजी नगरसेवक डोळस म्हणाले, ”गेली महिनाभर दिघी व उपनगरांमध्ये पाणी समस्या गंभीर होत आहे. एकतर दिवसाआड पाणीपुरवठा त्यात अपुरा व कमी दाबाने. दिवाळीच्या सणातही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. ऐन दिवाळीतही पाणीपुरवठा विस्कळीत राहिला. (Water supply) अपुऱ्या दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक खासकरून माताभगिनी त्रस्त झाल्या आहेत. दररोज पाणी तक्रारी संदर्भात अनेक नागरिकांचे फोन येत आहेत. याबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुनही दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासकीय राजवटीत अधिकारी कामे करत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पाण्याच्या समस्येकडे प्रशानाने गांभीर्याने पहावे. अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.