Children drowned : आडगाव येथील बंधाऱ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : आडगाव येथील बंधाऱ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश वाडेकर यांनी दिली आहे.(Children drowned) हे दोघे आडगाव येथील पाझर तलावात पोहण्यासाठी आले होते. त्यावेळी या दोघांचा बुडून मृत्यू झाला.

शिवम शंकर गोपाळे, वय 15 वर्षे, रा. आडगाव तालुका खेड, जि. पुणे व सार्थक राजेंद्र ढोरे, वय 15 वर्षे, रा. आडगाव मुळ गाव भोसरी या दोन मुलांचा बुडून मृत्यू झालेला आहे.(Children drowned) आडगाव हे पाईट पासून 12- 13 किलोमीटर लांब आहे तर चाकण पासून 40 काम लांब आहे. सार्थक ढोरे हा त्याच्या मामाच्या – शंकर गोपाळे यांच्या घरी दिवाळी सुट्टीत राहण्यास आला होता. तो काल रविवारी 30 ऑक्टोबरला दुपारी आडगाव मधील पाझर तलाव मध्ये पोहण्यासाठी त्याच्या मामाचा मुलगा शिवम गोपाळे सोबत गेला होता. ते दोघे तेथे बुडाल्याची माहिती चाकण पोलिसांना कळल्यावर पोलीस दुपारी 3 वा ते 3.30 वा चे दरम्यान घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला पण ते सापडले नाही.

Gopal Tiwari : केंद्रातील सत्तेच्या दहशतीवर राज्यातील प्रकल्प पळवणे ही गुजरात मॅाडेलची पोलखोल : गोपाळ तिवारी

आज सकाळी 11.30 वा. चे सुमारास त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. यावेळेस पोलीस नाईक गणेश वाडेकर, पोलीस हवालदार विठ्ठल रेगडे, पोलीस पाटील गणेश गोपाळे, सरपंच प्रकाश गोपाळे व ग्रामस्थ उपस्थित होते. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी ते दोन मृतदेह बाहेर काढले. (Children drowned) निलेश संपतराव गराडे (संस्थापक वन्यजीव रक्षक मावळ संस्था ), गणेश निसाळ(अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन सर्च अँड रेस्क्यु टीम वन्यजीव रक्षक मावळ संस्था ), भास्कर माळी मामा, सत्यम सावंत, विकी दौंडकर, अवी कारले, जिगर सोलंकी, विनय सावंत व अनिश गराडे यांच्या टीमने  मृतदेह बाहेर काढण्यात मदत केली. पोलीस नाईक गणेश वाडेकर म्हणाले की, दोन्ही मृतदेह शव विच्छेदणासाठी चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.