Gopal Tiwari : केंद्रातील सत्तेच्या दहशतीवर राज्यातील प्रकल्प पळवणे ही गुजरात मॅाडेलची पोलखोल : गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज : ‘गुजरात मॅाडेल’चा प्रचार (Gopal Tiwari) व प्रसार करून 2014 मध्ये केंद्रात आलेल्या मोदी-शहांच्या गुजरातला अखेर केंद्रातील सत्तेच्या दहशतीवर महाराष्ट्रातील प्रकल्प पळवण्याची वेळ येणे हीच गुजरात विकास मॅाडेलची पोलखोल असून, भाजपचे नैतिक अध:पतन झाल्याची घणाघाती टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी राज्यातील प्रकल्प गुजरातला जाण्याच्या पार्श्वभूमीवर केली.

वास्तविक भाजपने 2014 च्या लेकसभा निवडणूकीत तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र भाई मोदींना पंतप्रधान पदाचे ऊमेदवार जाहीर केले त्याची पार्श्वभुमीवर मुळात ‘कथित विकासाचे गुजरात मॅाडेल’ हे होते. मात्र, तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याचवेळी कथित गुजरात मॅाडेलचा पर्दाफाश करून त्यावेळी देखील विकासाच्या व रोजगारीच्या मुद्दयांवर गुजरातपेक्षा महाराष्ट्रच 1 नंबरवर (पुढे) असल्याचे जाहीर केले होते. व या विषयी खुल्या चर्चेचे आव्हान देखील तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लेकसभा निवडणुक काळातच वारंवार दिले होते, याचे स्मरण देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.

NCP Protest : द्या आमच्या रोजगारा ‘ची हमी, बंद करा गुजरातची गुलामी’..! राष्ट्रवादीचे आंदोलन

मोदी – शहांच्या भाजपला अधिक काळ देशातील जनतेची दिशाभूल (Gopal Tiwari) करता येणार नाही, अखेर वास्तवता ही समोर येतेच असेही गोपाळ तिवारी यांनी सांगितले. केंद्रातील सत्तेच्या आधारे राजकीय नेत्यांना नामोहरम करून वा प्रचंड अमिषे देवून विविध राज्यातील सरकारे पाडापाडी करण्याचा व ती अस्थिर करण्याचा संविधान विरोधी खेळ फार काळ चालणारा नाही याचे उचित भान भाजप नेत्यांनी ठेवावे, असेही ते म्हणाले. कारण असल्या खेळांमुळे राज्याच्या प्रगतीवर, स्थिरतेवर परिणाम होत असून राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर व पर्यायाने जनतेवरच याचा अनिष्ट परिणाम होत असल्याचा गंभीर इशारा देखील गोपाळ तिवारी यांनी दिला.

मोदी-शहांचे मित्र व गुजरातचे भांडवलदार उद्योजक यांचा लेकसभा निवडणुकीत भाजपला आर्थिकदृष्ट्या पाठींबा असल्याची चर्चा देखील भाजपच्या गोवा अधिवेशनात खुप रंगली असल्याचे वृत्त देखील पुढे आले होते व त्यामुळेच भाजपने इतर नेत्यांना सोडून नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे ऊमेदवार केले हे देखील सर्वश्रुत होते, अशी टीका गोपाळ तिवारी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.