Chikhali : चेंबर ब्लॉक झाल्याने गृहनिर्माण सोसायटीमध्ये साचले पाणी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. चिखली, नायर कॉलनी येथील चेंबर ब्लॉक झाले आहेत. त्यामुळे गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाणी साचले आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागात पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे. चिखली परिसरातील चेंबर ब्लॉक झाले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्गच नाही. त्यामुळे पाणी गृहनिर्माण सोसायटीमध्ये साचले आहे.

स्थानिक नागरिक अभिजीत खैरे म्हणाले, ”चिखली, नायर कॉलनी येथील चेंबर पूर्णपणे ब्लॉक झाले आहेत. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास मार्गच राहिला नाही. मित्तल गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना जाता-येता मोठी अडचण होत आहे. पाण्यातून जावे लागत आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.