Pimpri : मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानच्या सैन्याला नेस्तनाबूत करून भारतीय सैनिकांनी विजय संपादन केल्याचा दिन म्हणजे कारगिल विजय दिन उत्साहात साजरा आला. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड शहरतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अमर जवान स्तंभाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच कारगील युद्धाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. सर्व उपस्थितांनी सर्व जवानांच्या शौर्याला सलाम केला. मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.दामोदर पतंगे, डॉ दामोदर पतंगे प्राचार्य गोरख घोडके, प्रा. अभयकुमार हिरास, भूगोल फाउंडेशन अध्यक्ष डॉ. विठ्ठल वाळूंज, शंकर तांबे, प्रकाश इंगोले, शिवलाल कांबले, प्रीती काळे, समाजप्रबोधनकार शारदा मुंढे, साहेबराव गावडे, डी.एस. राठोड, राजेंद्र मोरे, शशिकांत दुधारे, रमेश जाधव, शिवलाल काबळे, आण्णा जोगदंड, तसेच भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघ, संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघ, मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारगिल युद्ध भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते. हिंदुस्थानी सैन्याने आपल्या प्राणाची बाजी लावून व साहसाचे प्रदर्शन करीत अति उंचावरच्या लढाईत भारताच्या अजेय शक्तीचे जगाला दर्शन घडविले. दक्ष राहण्याचा निश्चय हीच त्या संग्रामातील हुतात्मांना आदरांजली आहे, असे डॉ. दामोदर पतंगे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव सूर्यकांत कुरुलकर यांनी, तर आभार प्रकाश इंगोले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.