Maval : पवना धरण 62.65 टक्के भरले!; 24 तासात 160 मिलीमीटर पाऊस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात 62.65 टक्के (6.43 टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 160 मिलीमीटर पाऊस झाला असून 1 जूनपासून पाणलोट क्षेत्रात 1536 मिमि पावसाची नोंद झाली आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. यंदा महापालिकेने टप्पा-टप्प्याने पाणी कपात केली. पहिल्यांदा आठवड्यातून एकदा तर त्यामध्ये वाढ करत एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे.

  • जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. परंतु, त्यानंतर दहा दिवस पावसाने दडी मारली. आता पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असली. तरी, महापालिकेने सावध पाऊले टाकत तुर्तास पाणीकपात रद्द केली नाही.

आजमितीला धरणात 62.65 टक्के पाणीसाठा

  • पवना धरण माहिती :
    गेल्या २४ तासात झालेला पाऊस 160 मि.मि.
    1 जूनपासून झालेला पाऊस 1536 मि.मि.
    गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस 2116 मि.मि.
    धरणातील आजचा पाणीसाठा 62.65 टक्के (6.43 टीएमसी)
    गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 96.35 टक्के (8.20 टीएमसी)
    गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ 8.14 टक्के
    1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ 48.19 टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.