Weather Report : गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान:
कोंकण गोव्यात हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेल्रेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:
मध्य महाराष्ट्र: पन्हाळा, पुणे, शिरोळा 3 प्रत्येकी, बारामती, करमाळा 2, प्रत्येकी, जत, जुन्नर, खटाव वडूज, फलटण 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:
26 ऑक्टोबर: कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.
27-29 ऑक्टोबर: गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

इशारा:
26 ऑक्टोबर: कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता
27-29 ऑक्टोबर: काही नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.