Weather Report: पुणे परिसरात मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Weather Report: Forcast of moderate Rain in Pune area and torrential rain in sparse places घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई उनगरांत मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

एमपीसी न्यूज – पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तुरळक ठिकाणी मुसळधार तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई उनगरांत मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी (दि.3) सकाळपर्यंत कोकणात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत निर्माण झाला आहे.

पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : मालवण 19, हरनाई, मुंबई (कुलाबा) 17 प्रत्येकी, वेंगुर्ला 15, दापोली 14, बेलापूर (ठाणे), गुहागर, कुडाळ 11 प्रत्येकी, चिपळूण, देवगड, पेडणे, राजापूर, सावंतवाडी 10 प्रत्येकी, दाभोलीम (गोवा), म्हापसा, पनवेल , श्रीवर्धन 9 प्रत्येकी, अंबरनाथ, लांजा, केपे, रामेश्वर कृषी, रोहा, उल्हासनगर, वसई 8 प्रत्येकी, दोडामार्ग कणकवली, म्हसळा, मुरुड, रत्नागिरी, सुधागड पाली, ठाणे, उरण, वैभववाडी 7 प्रत्येकी, भिरा, कानाकोना, कल्याण, खेड, मंडणगड, माणगाव, सांगे, वालपोई 6 प्रत्येकी, भिवंडी, माथेरान, पालघर, पोलादपूर 5 प्रत्येकी, मडगाव, पेण, संगमेश्वर देवरुख, विक्रमगड 4 प्रत्येकी, खालापूर 3, मुरबाड 2, जव्हार, कर्जत, महाड, मोखेडा, तलासरी वाडा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा 8, महाबळेश्वर 7, साक्री 4, चांदगड, चांदवड, देवळा, लोणावळा (कृषी), सुरगाणा 3 प्रत्येकी, आजारा, अकोले, अमळनेर, धुळे, गडहिंग्लज, कळवण, पेठ, फत्रटण, राधानगरी, सतना बागलाण, शाहूवाडी 2 प्रत्येकी, गारगोटी, हर्सूल, इगतपुरी, मुळदे, नवापूर, पारोळा, पाटण, संगमनेर 1 प्रत्येकी.

मराठवाडा : घनसावंगी, किनवट 6 प्रत्येकी, धारूर, हिमायतनगर 4 प्रत्येकी, कन्नड 3, अंबड, धर्माबाद, लोहा, नायगाव खैरगाव, सिल्लोड 2 प्रत्येकी, बदनापूर, कैज, माजलगाव, रेणापूर 1 प्रत्येकी.

विदर्भ : मानोरा 5, दारव्हा, हिंगणघाट, कामठी, शिंदेवाही, सिरोंचा 4 प्रत्येकी, बाभुळगाव, नेर, वरोरा 3 प्रत्येकी, अहीरी, आरमोरी, बालापूर, बल्लारपूर, बतकुली, चिमूर, दर्यापूर, देवळी, दिग्रस, मंगळुरपीर, मूलचेरा, पारशिवनी, राळेगाव, वाशिम 2 प्रत्येकी, आर्णी, चामोर्शी, चांदूर, धामणगाव, धानोरा, गडचिरोली, जिवती, कळंब, कळमेश्वर, कारंजालाड, खामगाव, मेहकर, मुळ, नांदगाव काजी , नंदुरा, पातूर, संग्रामपूर, सावनेर, यवतमाळ 1 प्रत्येकी.

घाटमाथा : ताम्हिणी 9, कोयना (पोफळी), डुंगरवाडी ७7प्रत्येकी, अम्बोणे, दावडी, 4 प्रत्येकी, शिरगाव 4, खोपोली, खंद, कोयना (नवजा), भिवपुरी, ठाक्रवाडी 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज

5 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

6-7 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

5 जुलै: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍्यता.

6 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.