Talegaon : भविष्यात मिळणाऱ्या पेन्शनला पत्नीने स्वतःचे नाव लावले म्हणून पत्नीवर चाकुने वार

एमपीसी न्यूज – घरातील किरकोळ कारणे व पतीला मिळणाऱ्या भविष्यातील पेन्शनला पत्नीचे नाव लावल्याने पतीने पत्नीवर चाकूने वार केला. ही घटना 9 ऑगस्ट रोजी घरी कोटेश्वरवाडी येथे घडली आहे.

Pimpri : शहरातील दैनंदिन कचरानिर्मिती साडेबाराशे टनांवर!

याप्रकरणी पत्नीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.3) फिर्याद दिली आहे. दिलीप हरीभाऊ दाभाडे (वय 51 रा. मावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीवर चारित्र्याचा संशय़ घेत घरगुती काराणावरून शारिरीक व मानसीक त्रास दिला. आरोपी 2010 सालापासून फिर्यादीला त्रास देत होता. आरोपी हा देहूरोड सीओडी डेपोमध्ये कामाल आहे. त्याच्या भविष्यातील पेन्शनला फिर्यादी यांनी पत्नी असल्याचा अर्ज सीओडी डेपो येथे केला. याचा राग येवून आरोपीने फिर्यादी ला शिवीगाळ करत फिर्यादीच्या गळ्यावर चाकूने वार केला. तसेच हाताच्या बोटांच्या नसा कापल्या आहेत. यावरून तळेगाव (Talegaon) एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.