BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज – शिवीगाळ का करतोस, असे विचारल्याने महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केली. यात महिला गंभीर जखमी झाली. विकासनगर, देहूरोड येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.

सविता निरज चंडालीया (वय 25, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय ओमप्रकाश आठवाल (वय 58), अभिजित टाक, करण उर्फ काळू विजय आठवाल (वय 27, सर्व रा. विकासनगर, देहूरोड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सविता भाजी मंडईतून भाजी घेऊन येत असताना आरोपी विजय आठवाल मोठमोठ्याने शिवीगाळ करत होता. शिवीगाळ का करतो, असे फिर्यादी सविता यांनी विचारले. त्यावेळी आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्याला मारून गंभीर जखमी केले. तसेच आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like