Lonavala : देशमुख विद्यालयात इको-फ्रेंडली गणपती बनविण्याची कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज – देवघर येथील वामनराव हैबतराव देशमुख विद्यालयात नुकतीच इको-फ्रेंडली गणपती बनविण्याची कार्यशाळा संपन्न झाली. इयत्ता 5 वी ते इयत्ता 8 वी वर्गातील 150 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

विद्यालयातील कला शिक्षक अनिल पटेकर यांनी विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडू मातीच्या सुंदर गणपती मूर्ती कल्पकतेने साकारल्या व उत्कृष्ट रंगकाम केले. सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या मूर्ती गणेश चतुर्थीला स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यालयातील उपक्रमात सर्व शिक्षक सहभागी झाले होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे व सहभागी शिक्षकांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.