Wakad : भाजी खरेदी करताना महिलेची पर्स लंपास

एमपीसी न्यूज – आठवडे बाजारात भाजी खरेदी करताना महिलेची चोरट्याने 64 हजार रूपयांचा ऐवज असलेली पर्स लंपास केली. ही घटना वाकड येथील आठवडे बाजारात शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडली.

याप्रकरणी संगीता मोहन साबळे (वय 46, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी या वाकड, चौधरी पार्क येथील आठवडे बाजारात शुक्रवारी भाजी खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्याकडील 60 हजार रूपयांचे दागिने आणि चार हजार रूपयांची रोकड असा 64 हजारांचा ऐवज असलेली पर्स लंपास केली. फौजदार विकास मडके तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.