WTC Final : भारताची मोठ्या टी-20 मौसमांनंतर मोठी ‘कसोटी’

एमपीसी न्यूज – आयपीएल सारखा मोठा टी-20 सत्र नुकताच संपला आहे पण आता (WTC Final) भारतासमोर विश्व टेस्ट चॅम्पियनशीपची मोठी कसोटी आहे. भारताचा सामना  टेस्टमध्ये चांगली कामगिरी करत असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामना हा 7 जून 2023, बुधवारी सुरु होणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर डब्ल्यूटीसी चा अंतिम सामना होणार आहे व 20 षटकांच्या खेळी पासून स्वतःच्या मनाचा कल बदलत कसोटीसाठी चांगला सराव करावा लागेल. दोन्ही संघानी पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे व अंतिम सामन्यात काय होते हे बघण्यासारखे असेलच.

Pune : भाजपचे नेते नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली लव जिहाद विरोधात मोर्चा 

2023 च्या सुरुवातीला मुंबईमध्ये बीसीसीआय पदाधिकारी, कर्णधार रोहित शर्मा आणि माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्यात मोठी बैठक झाली होती. खेळाडूंच्या ‘वर्कलोड मॅनेजमेन्ट’ बाबत या बैठकीत चर्चा झाली होती. 2023 मध्ये विश्व टेस्ट चॅम्पिअनशीप आणि एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक होणार आहे.

 

यामुळे बीसीसीआय खेळाडूंना खेळण्यामुळे होणाऱ्या कामाच्या ओझ्यामुळे चिंतीत आहे. 2008 पासूनच आयपीएल नंतर खेळाडूंच्या दमणुकीमुळे कामगिरी खालावते असे दिसून आले आहे. भलेही ती 2009 च्या टी-20 विश्वचषकाची निराशाजनक मोहीम असेल अथवा इंग्लंडकडून 2011 मध्ये कसोटीत मिळालेली क्लीन-स्वीप असो.

या आयपीएल नंतर सुद्धा अद्याप या समस्येवर उपाय नाहीये. आयपीएल दरम्यान कोणत्याही खेळाडूचा ताण कमी होण्याची चिन्हे दिसले नाहीत. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात खेळणारे 4 खेळाडू – अजिंक्य राहणे (सीएसके), रवींद्र जडेजा (सीएसके), शुभमन गिल (जीटी), मोहम्मद शमी (जीटी) खेळाडू तर आयपीएलच्या तणावपूर्ण अंतिम सामन्यात अडकले होते. भलेही टी-20 क्रिकेटचे लहान स्वरूप असले तरी सामन्यांची तीव्रता जास्त असते. त्यावरून 2 सामन्यांमध्ये विश्रांतीसाठी कमी वेळ मिळतो.

 

म्हणून भलेही भारतीय खेळाडू दमले असले तरी ऑस्ट्रेलियन खेळाडू सुद्धा दमलेले असतील. खेळाडूंना असलेला थकवा हा बरोबर फिजिओथेरपीने घालवण्यात येऊ शकतो. हे घटक असले तरी डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना भरपूर रोमांचक आणि मनोरंजक होण्याची अपेक्षा क्रिकेट समर्थकांनी ठेवली (WTC Final)आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.