Talegaon Dabhade : घोरावडेश्वर मंदिरासह सर्व शिव मंदिरांच्या यात्रा रद्द

तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांची माहित

एमपीसी न्यूज : महाशिवरात्रीच्या निमित्त तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरावडेश्वर मंदिरासह सर्व शिव मंदिरांच्या यात्रा (उत्सव) रद्द करून साध्या पध्द्तीने पुजारी व विश्वस्तांच्या हस्ते विधिवत पूजा करून उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली.  

तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी घोरावडेश्वर पुरातत्व विभागाचे सदस्य संदीप पडवळ, स्वयंभू महादेव मंदिराचे प्रतिनिधी अभिजित टकले,बनेश्वर मंडळाचे प्रतिनिधी राजेश सरोदे,रुपेश गरुड,सिद्धेश भेगडे,सोपान शीव मंदिराचे अनिल करंडे, वीणा करंडे आदि उपस्थित होते.

कोरोना संक्रमणाच्याबाबत  शासन नियमानुसार जास्त गर्दी होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी फक्त मंदिरातील पुजारी व प्रतिनिधी यांचे उपस्थितीमध्ये शिव शंकराची विधीवर धार्मिक पूजा करण्यात येणार असून मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

महाशिवरात्रीच्या निमित येणारे विक्रेते,दुकानदार,मनोरंजन करणारे खेळणी, पाळणे,चक्री आदि खेळणी लावण्यास बंदी घातली असून भाविकांना देखील मंदिरात प्रवेश करून मिळणार नसल्याची माहिती जाधव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.