Mumbai News : मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशात नेण्याबाबत खलबतं?

योगी आदित्यनाथ आज मुंबईत, बॉलिवूड निर्मात्यांसोबत बैठक

एमपीसी न्यूज : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज (२ डिसेंबर) रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. योगी आदित्यनाथ 1 डिसेंबर रोजी मुंबईला येण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रवाना झाले असून काल रात्री ते मुंबईत पोहोचले . त्यानंतर आज (२ डिसेंबरला) ते मुंबई शेअर बाजाराला भेट देतील.

यावेळी योगी त्यांच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील उद्योगपती, तसेच बॉलिवूड निर्मात्यांसोबत बैठक घेतील. या बैठकीत उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे ते आवाहन करतील. रतन टाटा, आदित्य बिरला असे बडे उद्योगपती या बैठकीत सहभागी होणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थांचे सेवन करण्याबाबत संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये (Bollywood Industry) खळबळ उडाली होती. अंमली पदार्थांबाबत बॉलिवूडमधील अनेक अभिनेता आणि अभिनेत्री एनसीबीच्या (NCB) रडारवर होते. त्यामुळे देशभरातून बॉलिवूड क्षेत्रावर टीकांचा (Criticize) झडीमार झाला. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूड फिल्मसिटी उत्तर प्रदेशला उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) काल मंगळवारपासून मुंबई दौऱ्यावर (Mumbai Tour) आहेत. मुंबईमध्ये दाखल होताच त्यांनी सर्वात पहिले खिलाडियो के खिलाडी अक्षय कुमारची (Akshay Kumar) भेट घेतली. त्यानंतर आज बुधवारी मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये काही निर्माते, गूंतवणूकदार आणि उद्योगपतींशी बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.

सध्या देशाला एका चांगल्या फिल्मसिटीची गरज आहे. सर्वांत मोठ्या हिंदी फिल्म उद्योगासाठी मुंबई प्रसिद्ध आहे. पण देशातली सर्वांत मोठी आणि सुंदर फिल्मसिटी ही उत्तरप्रदेशला उभारण्यात येणार आहे. ही फिल्मसिटी गौतमबौध्दनगरमधल्या ग्रेटर नोएडामध्ये १००० एकरात उभी करण्यात येणार आहे. या फिल्मसिटीमुळे निर्मात्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होईल आणि रोजगारही वाढेल. असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.