Pune Crime News : सराईत गुन्हेगाराकडून चोरीचे 10 मोबाईल हस्तगत

एमपीसीन्युज : पेट्रोलिंग करीत असताना ताब्यात घेतलेल्या दोन आरोपीकडून दत्तवाडी पोलिसांनी चोरीचे 10 मोबाईल हस्तगत केले आहेत. 1 लाख 25 हजार रुपये किमतीचे हे मोबाईल त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरले होते. दोन्ही आरोपीविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आतिष हंसराज माने (वय 21, जनता वसाहत, पर्वती, पुणे) आणि एक अल्पवयीन आरोपी आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दत्तवाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी संतोष क्षीरसागर हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना वरील आरोपी चोरीचे मोबाईल घेऊन दांडेकर पूल येथील पेट्रोल पंपाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर त्यांनी वरील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असलेले चोरीचे 10 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. हे दोघे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात विश्रामबाग आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर, दीपक मते, एकनाथ कंधारे, मच्छिंद्र वाळके, रामदास गोणते, हनुमंत गायकवाड, संदीप तळेकर, सुजित पवार, सोनम नेवसे यांच्या पथकाने केली

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.