Ravet : विकासनगरला ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवा; नगरसेविका खानोलकर यांची मागणी

एमपीसी न्यूज – किवळे, विकासनगर परिसरातील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे नसल्याने परिसराची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यासाठी विकासनग परिसरात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका स्थायी समिती सदस्या प्रज्ञा खानोलकर यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका खानोलकर यांनी म्हटले आहे. विकासनगर येथे माझे जनसंपर्क कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी कार्यालया शेजारील बेकरी आणि दुकानांची तोडफोड केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरात महापालिकेमार्फत ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे हल्लेखोरांचा शोध घेणे अवघड आहे.

‘सीसीटीव्ही’ कॅमेरे असते तर त्यात हल्लेखोर कॅमे-यात कैद झाले असते. त्यामुळे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेणे सोपे झाले असते. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी विकासनगर परिसरात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.