Vadgaon Maval : बाल विकास मित्र मंडळ, चिंचेचा गणपती ठरला गणराया अॅवार्ड- 2018 चा मानकरी

गणराया अवॉर्ड सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

एमपीसी न्यूज – मावळ ग्रामीण पत्रकार संघ व वडगाव मावळ पोलीस ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणराया अवॉर्ड सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2018 या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज गुरुवारी रोजी झाला.

पारितोषिक वितरण समारंभ वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे आज,गुरुवारी पार पडला. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, आय पी एस पोलीस अधिकारी नवनीत कुमार कावत, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, कान्हेचे पोलीस पाटील शांताराम सातकर, मावळ तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष राहुल ढोरे, भाजपाचे प्रभारी भास्कर अप्पा म्हाळसकर, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे, नगरसेवक सुनील ढोरे, दिनेश ढोरे, राजेंद्र कुडे, सुनील शिंदे, अतुल राऊत, व्याख्याते विवेक गुरव,विशाल वहिले सुधाकर ढोरे आदी उपस्थित होते.

वडगाव मावळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणा-या अकरा कार्यक्षम पोलीस पाटलांचा यावेळी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केले. प्रास्ताविक विजय सुराणा यांनी केले. सुत्रसंचालन पत्रकार गणेश विनोदे व रामदास वाडेकर यांनी केले तर आभार भारत काळे यांनी मानले.

व्याख्याते विवेक गुरव, राजेंद्र पवार, पोलीस गणेश तावरे, वि म शिंदे गुरूजी आदींनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

विजय सुराणा, ज्ञानेश्वर वाघमारे, गणेश विनोदे, सचिन शिंदे, रामदास वाडेकर, भारत काळे, निलेश ठाकर, सचिन ठाकर, प्रभाकर तुमकर, संकेत जगताप, बाळासाहेब भालेकर यांच्यासह पोलीस हवालदार गणेश तावरे, मनोज कदम आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

गणराया अॅवार्ड सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे विजेते

गणराया अॅवार्ड- 2018 चा मानकरी- बाल विकास मित्र मंडळ, वडगाव, चिंचेचा गणपती.
प्रथम क्रमांक- जय मल्हार मित्र मंडळ, खंडोबा चौक, वडगाव मावळ,
द्वितीय क्रमांक- जय हिंद मित्र मंडळ, चावडी चौक, वडगाव मावळ.
तृतीय क्रमांक- अष्टविनायक मित्र मंडळ, पाटील वाडा, वडगाव.
प्रोत्साहान पुरस्कार- आदर्श मित्र मंडळ, ढोरे वाडा, ओंकार मित्र मंडळ, तळयाशेजारी, वडगाव.

ग्रामीण

प्रथम क्रमांक-कानिफनाथ तरूण मंडळ, ब्राह्मणवाडी
द्वितीय क्रमांक- हिंदुतेज मित्र मंडळ, जांभूळ, संघर्ष मित्र मंडळ, साते
तृतीय क्रमांक- ओंकार मित्र मंडळ, खडकवाडी, शिवली.
उत्तेजनार्थ अष्टविनायक मित्र मंडळ, जांभूळ, मौलाली तालीम मंडळ, टाकवे बुll

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.