Pimpri: अखेर पुणे मेट्रो रुळावर ! मेट्रोचे डबे रुळावर बसविण्यास सुरुवात (व्हिडिओ)

मेट्रोचे काम लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न

एमपीसी न्यूज – पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील काम वेगात सुरु आहे. मेट्रोचे डबे मोठ्या अवजड क्रेनच्या सहाय्याने रुळावर बसविण्याच्या कामाला आज (सोमवार) पासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे मेट्रो रुळावर येत असून काम लवकर पूर्ण करण्याचे महामेट्रोचे प्रयत्न सुरु आहेत.

पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवरील काम प्रगतीपथावर आहे. जून 2017 मध्ये महामेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मेट्रो मार्गिकेचे खांब उभारणे, रूळ अंथरणे, विद्युत तारा, सिग्नल आणि अन्य तांत्रिक कामे वेगाने झाली. तीस महिन्यांच्या कालावधीत बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर, मेट्रोसाठी नागपूर येथून कोच आणण्यात आले आहेत.

मेट्रोचे दोन संच नागपूरहुन मागील रविवारी (दि. 22) पुण्याकडे रवाना झाले होते. तब्बल आठ दिवसांच्या प्रवासानंतर हे कोच काल रविवारी (दि. 29) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. तीन डब्यांची एक मेट्रो असणार असून पहिल्या मेट्रोचे तीन कोच शहरात दाखल झाले आहेत. त्यानुसार आजपासून लगेच मेट्रोचे डबे रुळावर बसविण्यास सुरुवात झाली आहे. अवजड क्रेनच्या सहाय्याने डबे रुळावर टाकले जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, महामेट्रोने डिसेंबरअखेर पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो धावेल असा दावा केला होता. परंतु, मेट्रोचा दावा फोल ठरला आहे. डिसेंबरअखेर महामेट्रो धावू शकली नाही. त्यामुळे काम वेगात पूर्ण करण्याचे महामेट्रोचे प्रयत्न सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.