Akurdi : रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – धावत्या रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये एका महिलेचा व पुरुषाचा समावेश आहे. ही घटना आज, शुक्रवारी (दि. 10) पहाटे पावणेसहाच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ घडली.

गौतमी महेंद्र जाधव (वय 29, रा. चिखलीगाव), रवी चंदर पिवाल (वय 35, रा. विकासनगर, देहूरोड) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पावणे सहा वाजताच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत गौतमी आणि रवी या दोघांचा मृत्यू झाला. गौतमी आणि रवी दोघे एकमेकांना ओळखत होते. मागील काही दिवसांपूर्वी गौतमीचे पती आणि रवी यांची पत्नी या दोघांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.