Vadgaon Maval : अतुल राऊत यांचा सामाजिक कार्यकर्ते विशेष सन्मानाने गौरव

एमपीसी न्यूज- श्री योगेश्वर प्रतिष्ठान, श्री शिवसमर्थ प्रतिष्ठान, संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वडगाव मावळ येथील स्मित कलारंजन व बालविकास मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल चंद्रकांत राऊत यांना सामाजिक कार्यकर्ते या उपाधीने गौरविण्यात आले.

यावेळी मावळ पंचायत समिती सभापती निकिता घोटकुले, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, नगरसेवक राजेंद्र कुडे, विजय जाधव, माजी सरपंच नितीन कुडे, वक्ते शामराव गुजरपाध्ये, श्रीकांत सरडे, नंदकिशोर गाडे, शंकर भोंडवे, आदिनाथ ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते.

राऊत हे मावळ तालुका ओबीसी सेलचे अध्यक्षअसून अष्टपैलू नेतृत्व म्हणून सुपरिचित आहेत. कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, सहकार आदी क्षेत्रात त्यांचा वावर आहे. त्याचबरोबर स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान, मावळ विचार मंच, मावळ सोशल फाऊंडेशन, श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था, AR ग्रुप अशा अनेक संस्थांवर विविध पदावर गेली 15 वर्षे सक्रिय कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.