होळीनिमित्त वल्लभनगर आगारातून कोकणवासीयांसाठी सुटणार 16 जादा गाड्या

एमपीसी न्यूज – होळी अगदी दहा दिवसावर आली असून शहरातील कोकणवासींयांना कोकणात म्हणजे गावी जाण्याचे वेध लागले आहेत. मात्र एेनवेळी होणार गर्दी पाहता गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही वल्लभनगर आगारातर्फे होळीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार खास होळीसाठी वल्लभनगर आगारातून  कोकणवासीयांसाठी 16 जादा  गाड्या सोडण्यात येणार आहेत.



याजादा गाड्या कोकणमधील दापोली, पोलादपूर, महाड, खेड, चिपळूण, गुहागर, कासाई आणि देवरूख या ठिकाणी  येत्या गुरुवारपासून  9 मार्च ते 12 मार्च या चार दिवसाच्या कालावधीत सोडण्यात येणार आहेत. नागरिकांना ऑनलाईन किंवा आगारामध्ये आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. समूहाने नागरिकांनी एसटीची मागणी केल्यास त्यांच्यासाठी यापेक्षा अधिक एसटी सोडण्याचे नियोजन असल्याचेही  आगारप्रमुख अनिल भिसे यांनी सांगितले.  



या 16 ही गाड्यांचे आराक्षणे खुली झाली असून नागरिक प्रत्यक्ष जाऊन किंवा ऑलाईन पद्धतीने आरक्षण करु शकतात.गणपती उत्सवाप्रमाणेच होळीमध्येही कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी एसटीमहामंडळातर्फे जादा गाड्यांचे दरवर्षी नियोजान करण्यात येते. होळी प्रमाणे आता एसटीमहामंडळ उन्हाळी सुट्ट्यांसाठी जागा गाड्यांचे लवकरच नियोजन करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.