Quality Circle Forum of India : क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया चॅप्टरच्या कन्व्हेन्शनमध्ये 180 संघाचा सहभाग

एमपीसी न्यूज – क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया (Quality Circle Forum of India) पुणे चॅप्टरच्या वतीने भोसरी येथील क्वॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटरमध्ये 55 वे मिनी कन्व्हेन्शनमध्ये एकूण 180 संघांनी सहभाग घेतला होता.

टाटा, किर्लोस्कर, मिंडा, कमिन्स, जेसीबी, स्पायसर, शिंडलर, दाना, उद्योग समूह, जी.ई. इंडस्ट्रिज, कॅडबरी इंडस्ट्रिज अशा 49 कंपनीतील सुमारे 500 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. दोन सत्रात झालेल्या स्पर्धेत विविध उद्योग समुहातील विजेत्या संघाला सुवर्ण, रौप्य व रजत पुरस्कार, स्मृतीचिन्ह स्वरुपात फोरमचे पदाधिकारी परवीन तरफदार, भुपेश मॉल, अनंत क्षीरसागर आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण संतोषकुमार रामचंद्र, पवनकुमार रवंदळ, दिपक कासार, राहुल काशीकर, रणजीत जाधव, श्यामकांत दिक्षीत, अभिजीत देशपांडे, विश्वनाथ मोरे, शैलेश तुपे यांनी केले.

Rotary Club : शहराला कोरोना मुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे

क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे चॅप्टरच्या वतीने विविध उद्योग समूहात विविध प्रकारच्या वस्तु उत्पादीत करीत असलेल्या वस्तूंची गुणवत्ता सुधारणे, उत्पादकता वाढविणे, ग्राहकांना अपेक्षितपूर्तीसाठी बाजारपेठा उपलब्ध करणे, वस्तूंचे वितरण व्यवस्था, सुरक्षा, गुंतवणुकीत होणारा अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाय योजना राबवल्या गेल्या. या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विविध स्पर्धकांनी (Quality Circle Forum of India) परीक्षकांसमोर वरील विषयाला अनुसरुन केस स्टडी प्रेझेन्टेशन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रुमाले, ललिता परदेशी यांनी केले. तर, संयोजन चंद्रशेखर रुमाले, प्रशांत बोराटे, सुनील वाघ, रहीम मिर्झा बेग यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.