Rotary Club : शहराला कोरोना मुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे

एमपीसी न्युज – भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी (Rotary Club) यांच्या संयुक्त विद्यमाने 75 दिवस मोफत कोरोना लसीकरणाचा पहिला, दुसरा आणि बूस्टर डोस दिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे परिसरातील चार ठिकाणी या लसीकरण केंद्रांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्र,तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत 75 दिवस मोफत बूस्टर डोस व पहिला व दुसरा डोस यांच्या लसीकरण केंद्रांचा शुभारंभ रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर रो मंगेश गारोळे, वैद्यकीय अधिकारी उन्मेष गुट्टे, रोटरी सिटीचे अध्यक्ष रो दीपक फल्ले, रो विलास काळोखे, रो संजय मेहता रो सुरेश शेंडे, रो शाहीन शेख, रो किरण ओसवाल, रो भगवान शिंदे, रो मिलिंद निकम, रो रेश्मा फडतरे, रो वैशाली खळदे, रो प्रशांत ताय, रो तानाजी मराठे, रो चेतन पटवा यांच्या उपस्थितीत खालील ठिकाणी संपन्न झाला.
1) रो डॉ सौरभ मेहता,अश्विनी डेंटल क्लिनिक
2) रो डॉ धनश्री काळे,सनशाइन क्लिनिक
3) रो डॉ रोहित मिणियार,स्वस्थ्या क्लिनिक
4) डॉ मधुरा निकम,इंद्रायणी क्लिनिक,आंबी
या सर्व ठिकाणी लसीकरण चालू करण्यात आले.
रोटरी सिटीच्या या उपक्रमाचे कौतुक करताना तळेगाव शहरातील सर्व नागरिकांनी तळेगावला कोरोना मुक्त करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीने आयोजित केलेल्या या लसीकरण मोहिमेत सहभाग घेऊन तळेगाव शहराला सुदृढ बनवावे असे आवाहन असिस्टंट गव्हर्नर रो मंगेश गारोळे यांनी केले. तर, अध्यक्ष दीपक फल्ले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राने रोटरी सिटीला बरोबर घेऊन हा उपक्रम केल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष नितीन मराठे व प्राथमिक आरोग्य केंद्रातील (Rotary Club) सर्व अधिकारी वर्ग यांचे आभार मानले.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बूस्टर डोस, प्रथम व द्वितीय डोससाठी होणारी गर्दी लक्षात घेता जर तळेगाव शहरात आणखी काही ठिकाणी आपण लसीकरण केंद्र चालू केली. तर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील गर्दी कमी होऊन तळेगाव शहरातील नागरिकांना जवळ लसीकरण केंद्र उपलब्ध होईल. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक याचा लाभ घेतील. त्या उद्देशाने आपण चार वेगवेगळ्या ठिकाणी हे लसीकरण केंद्र सुरू केले आहे. तळेगाव स्टेशन येथील पेट्रोल पंपासमोर पाचवे लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचा मनोदय रो किरण ओसवाल यांनी व्यक्त केला.
रो विलास काळोखे व आरोग्य अधिकारी उन्मेष गुट्टे यांनी तळेगाव शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करून आपल्या तळेगाव शहराला सुदृढ बनवावे (Rotary Club) असे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.