BNR-HDR-TOP-Mobile

Kondhava : बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास

0 63
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – कोंढवा येथे फ्लॅटचे कुलूप उचकटून सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना 2 मे ते 14 मेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कोंढवा येथे मिठानगरमध्ये ऑरेंज हिल्स बिल्डिंग येथे पाचव्या मजल्यावर फ्लॅट आहे. या बिल्डिंगची लिफ्ट खराब झाल्याने तसेच नातेवाईकांची तब्येत खराब झाल्याने जवळच्याच भाग्यलक्ष्मी टॉवर येथे राहायला गेल्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने व परदेशी चलन असा एकूण दोन लाख 47 हजार किमतीचा ऐवज लंपास केला. कोंढवा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3