Pimpri: रहाटणीतील दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; पुण्यातील आणखी एकाचा वायसीएमएचमध्ये मृत्यू

दिवसभरात तिघांचा मृत्यू; आजपर्यंत 12 जणांचा बळी. 2 more from Rahatani test positive to coronavirus while 2 covid19 patients from Pune die in YCMH

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड परिसरातील रहाटणीतील दोघांचे आणि पुण्यातील पण वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्या दोघांचे अशा चार जणांचे आज (शुक्रवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. सकाळीच किवळे, विकासनगर येथील एकाचे आणि पुण्यातील दोघांचे असे तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे दिवसभरात सात नवीन रुग्णांची भर पडली आहे. तसेच पुण्यातील आणखी एकाचा वायसीएमएच मध्ये मृत्यू झाला आहे. सकाळी दोघांचा मृत्यू झाला होता. दिवसभरात तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला असून आजपर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट सायंकाळी आले आहेत. त्यामध्ये रहाटणीतील 45 वर्षीय पुरुष आणि 25 वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय खडकी, येरवड्यातील 80 वर्षीय पुरुष आणि 42 वर्षीय महिलेचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

तर, पुण्यातील येरवडा येथील रहिवासी पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, सकाळी पुण्यातील दोघांचा मृत्यू झाला होता. आजपर्यंत पुण्यातील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आठ आणि शहरातील चार अशा 12 जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

महापालिका रुग्णालयात सक्रिय 60 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, पिंपरी-चिंचवड शहरातील 186 आणि शहराबाहेरील 24 अशा 210 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. 116 जणांनी आत्तापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल!

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 67
# पॉझिटीव्ह रुग्ण – 07
#निगेटीव्ह रुग्ण – 54
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 72
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 130
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 54
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 210
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 60
# शहरातील कोरोना बाधित सहा रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 12
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 116
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 27803
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 89521

रहाटणी, किवळेतील ‘हा’ परिसर सील!
रहाटणी, किवळे विकासनगर परिसरात आज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रहाटणीतील (नंदु जाधव उद्यान समोर-भिकोबा तांबे शाळा- नम्रता क्रिस्टल पार्क सोसायटी), किवळे विकासनगर येथील (छत्रपती शिवाजी महाराज चौक- विकासनगर मेन रोड- सुहाना चिकन शॉप-गणेश मंदिर-वामन स्मृती हौसिंग सोसायटी-सुमन मंगल केंद्रासमोर-श्रीनगर रोड) हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.