World Corona Update: कोरोनाबाधित मृतांचा आकडा तीन लाखांवर, मात्र कोरोनामुक्तांची संख्या 17 लाखांवर!

World Corona Update: Corona-related death toll rises to 3 lakh, while corona-free patients count rises to 17 lakh!

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधित मृतांच्या आकड्याने काल तीन लाखांचा टप्पा ओलांडला असला तरी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या 17 लाखांचा टप्पा पार केला आहे. एकूण कोरोना रुग्णांपैकी मरण पावलेल्यांचे प्रमाण 6.70 टक्के असून कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण 37.7 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 45 लाख 21 हजार 989 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींच्या आकड्याने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जगभरात आतापर्यंत एकूण 3 लाख 03 हजार 082 (6.70 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 17 लाख 02 हजार 394 (37.7 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 25 लाख 30 हजार 333 इतके सक्रिय रुग्ण आहेत.

मागील सहा दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

8 मे – नवे रुग्ण 97 हजार 128  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 550

9 मे – नवे रुग्ण 88 हजार 997  दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 248

10 मे – नवे रुग्ण 79 हजार 825 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 510

11 मे – नवे रुग्ण 74 हजार 228  दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 403

12 मे – नवे रुग्ण 85 हजार 315  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 320

13 मे – नवे रुग्ण 88 हजार 220  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 314

14 मे – नवे रुग्ण 96 हजार 334  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 317

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 87 हजारांच्या घरात

अमेरिकेत गुरुवारी 1,715 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 86 हजार 912 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 14 लाख 57 हजार 593 झाली आहे.

ब्राझीलमध्ये काल (गुरुवारी) 835, इंग्लंडमध्ये 428, फ्रान्समध्ये 351 तर मेक्सिकोमध्ये 294 कोरोनोबाधित मृत्यू नोंदविले गेले. काल इटलीत 262, स्पेन 217, कॅनडा 170, पेरू व भारत प्रत्येकी 98, रशियात 93, इराणमध्ये 71, स्वीडन 69 तर जर्मनीत 67 बळी गेले आहेत.

जागतिक क्रमवारीत पाकिस्तान 20 व्या स्थानावर

कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत चिलीने (गुरूवारी) वरचे स्थान मिळवले आहे. पाकिस्तानला मागे टाकत 19 वे स्थान मिळविले आहे. पाकिस्तान आता 20 व्या स्थानावर आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 14,57,593 (+27,246), मृत 86,912 (+1,715)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 2,72,646 (+1,551), मृत 27,321 (+217)
  3. रशिया – कोरोनाबाधित 2,52,245 (+9,974), मृत 2,305 (+93)
  4. यू. के. – कोरोनाबाधित 2,33,151 (+3,446), मृत 33,614 (+428)
  5. इटली – कोरोनाबाधित 2,23,096 (+992), मृत 31,368 (+262)
  6. ब्राझील – कोरोनाबाधित 2,02,918 (13,761), मृत 13,993 (+835)
  7. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,78,870 (810), मृत 27,425 (+351)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 1,74,975 (+877), मृत 7,928 (+67)
  9. टर्की – कोरोनाबाधित 1,44,749 (+1,635), मृत 4,007 (+55)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,14,533 (+1,808), मृत 6,854 (+71)
  11. चीन – कोरोनाबाधित 82,929 (+3), मृत 4,633 (+0)
  12. भारत – कोरोनाबाधित 81,997 (+3,942) , मृत 2,649 (+98)
  13. पेरू –  कोरोनाबाधित 80,604 (+4,298) , मृत 2,267 (+98) 
  14. कॅनडा –  कोरोनाबाधित 73,401 (+1,123), मृत 5,472 (+170)
  15. बेल्जियम – कोरोनाबाधित 54,288 (+307), मृत 8,903 (+60)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 46,869 (+2,039) मृत 283 (+10) 
  17. नेदरलँड – कोरोनाबाधित 43,481 (+270), मृत 5,590 (+28)
  18. मेक्सिको – कोरोनाबाधित 40,186 (+1,862), मृत 4,220 (+294)
  19. चिली – कोरोनाबाधित 37,040 (+2,659), मृत 368(+22)
  20. पाकिस्तान – कोरोनाबाधित 35,788 (+490), मृत 770 (+9)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.