Pimpri : रिपब्लिकन पक्षाच्या ‘अक्षय भोजन’ योजनेतून दररोज 5300 गरजूंना मिळतोय मायेचा घास 

एमपीसी न्यूज – पुण्यातील झोपडपट्टी व चाळीत  राहणाऱ्या  भुकेलेल्या व गरजूंसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यानी मिळून  अक्षय भोजन योजना सुरू केली. या माध्यमातून दररोज जवळपास 5300 लोकांच्या नागरिकांच्या जेवणाची सोय होत आहे.

या योजनेसाठी रोज स्वच्छ सात्विक भोजन तयार करून  ते वेळेवर योग्य जागी पोहोचवणे, पोलीस आणि प्रशासनाची परवानगी घेणे, कार्यकत्यांची काळजी घेणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, सर्वांमध्ये संपर्क आणि समन्वय साधणे अशा सर्व बारीकसीक बाबींचा सांगोपांग विचार आणि अंमलबजावणी करण्यात आली.

भोजन तयार करण्यासाठी सहा तात्पुरती सॅटेलाइट किचन उभी करण्यात आली असल्याची माहिती नॅशनल युनीयन ऑफ हॉस्पिटैलिटी इंडस्ट्री ऑफ  इंडियाच्या  राष्ट्रीय अध्यक्ष सानी अवसरमाल यांनी दिली.

हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ऑफ इंडिया, पुणे डिव्हीजनकडे असलेल्या कार्यकर्त्यामुळे त्यांच्याकडे या कामाची धुरा सोपवण्यात आली आणि  त्या सर्वांनी या योजनेची परिणामकारकरित्या अंमलबजावणी केली.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील महारथी बिंद्रास हॉस्पिटॅलिटी, न्यू प्रशांत केटरींग कंपनी, उबर हॉस्पिटॅलिटी प्रा. लि., रणजीत हॉस्पिटॅलिटी सर्वीसेस आणि सोलापूर सोशल फाउंडेशन या सर्वांच्या सहकार्याने सुरुवातील 200 लोकांसाठी चालू केलेल्या या योजनेचा विस्तार होत गेला आणि आज रोजी 5300 भुकेलेल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

या योजनेच्या माध्यमातून पुण्यातील रामवाडी, सिद्धार्थनगर, मुळीक वस्ती, विमान नगर ट्रॉझीट कैप, वडगांव शेरी ट्रांझीट कप, सोपान नगर, लोहगांव, संत नगर, चिरके वस्ती, राजीव गांधी नगर, चंदन नगर, खुलेवाडी ट्रॉझीट कैप, हडपसर, वैद्रवाडी, समर्थ नगर, मार्गदाता विहार, मांजरी, पिंपरी चिंचवड, खराळवाडी, डांगे चौक, गांधी नगर झोपडपट्टी, केशव नगर लोणकर वस्ती, घोरपडे वस्ती, लोणी काळभोर, लोणी स्टेशन आणि अशाच इतर अनेक ठिकाणी भोजनाचा पुरवठा केला जात आहे.

सानी अवसरमालांनी  म्हणाल्या,  ही महायोजना कोवीड – 19 आपत्कालानंतरही अविरतपणे चालू ठेवून या अंतर्गत झोपडपट्टी वासीयांना त्यांची जागरुकता, शिक्षण, सक्षमता वाढविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करून त्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवलं जाणार आहे. समाजातील वंचित वर्गाची प्रगती झाली तर यातूनच सक्षम, समुध्द भारताची निर्मिती होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

‘आरपीआय’चे सर्व जेष्ठ पदाधिकारी आणि सहकारी रिपब्लिकन अक्षय भोजन योजनेसाठी काम करत आहेत. यात एमडी शेवाळे, एमटी सावंत, विनोद निकालजे, डॉ. सिध्दार्थ धेंडे, महेंद्र कांबळे, परशुराम वाडेकर, अजीज शेख, मंदार जोशी, चंद्रकांता सोनकांबळे, अशोक शिरोळे, अशोक कांबळे, असीत गांगुर्डे, संघमित्रा गायकवाड, संगीता आठवले, शशीकला वाघमारे, एड. मिलींद सावंत, सतीश केदारी, हरीश देखणे, विष्णु दादा भोसले, जयदेव रंधवे, शैलेंद्र चव्हाण, चंद्रकांत जगताप, आतीश कांबळे, संजय माने, यादव हरणे, दत्ता दिंडोर, वत्सला क्षीरसागर, रवी अवसरमल, शाम सदाफुले, वैभव पवार  यांचा अमुल्य वाटा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.