शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

मतदान केंद्रावर लावण्यात आलेले उमेदवारांच्या माहितीचे फलक काढले

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी आज सकाळपासून मतदानास सुरुवात झाली आहे. यावेळी मतदारांच्या माहितीसाठी पहिल्यांदाच उमेदवारांच्या शिक्षणापासून ते त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांपर्यंतची सर्व बित्तम माहिती देण्यात आली आहे. मात्र वाकड येथील प्रभाग क्रमांक 25 मधील मतदान केंद्र 22 येथे लावण्यात आलेले फलक काढून टाकले आहेत.

पुणे आणि पिंपरी प्रत्येक बूथबाहेर उमेदवारांच्या माहिती दर्शवणारे फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक अहर्ता, त्याच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे तपशील, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नमूद केली आहे. हे फलक दर्शनीय भागात लावण्यात आले आहेत

आज दुपारी वाकड येथील प्रभाग क्रमांक 25 मधील एका मतदान केंद्रावर उमदेवरांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. परंतु  हे फलक काढून टाकण्यात आल्याने निवडणूक आयोगाचे नियमांची पायमल्ली करण्यात आली असल्याची चर्चा मतदारांमध्ये सध्या सुरु आहे.

spot_img
Latest news
Related news