मराठी भाषा राजदिनानिमित्त रेडिओ एफटीआयआयतर्फे विशेष कार्यशाळा

एमपीसी न्यूज – मराठी राजभाषा दिनानिमित्त एक विशेष कार्यशाळा रेडिओ एफटीआयआय येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत मराठी भाषेसंबंधाने तसेच कवी व नाटककार कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा जागर अभिनव पद्धतीने करण्यात येणार आहे. प्रसार माध्यमांतील मराठी या विषयावरही चर्चा होणार आहे. ही कार्यशाळा थेट तसेच ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती रेडिओ एफटीआयआयचे संजय चांदेकर यांनी दिली.

 

यामध्ये पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. अविनाश सांगोलकर, विद्यावाणी रेडिओ प्रमुख आनंद देशमुख, भैरवी पुरंदरे, प्रा.वैशाली जुंदरे, ‘मराठी काका’ प्रा. अनिल गोरे आणि रेडिआ एफटीआयआयचे संजय चांदेकर व प्रा.आश्विन सोनोने सहभागी आहेत. याच दिवसापासून एकूण तब्बल 75 भागांच्या दोन मराठी भाषा विषयक मालिका प्रसारित करण्यात येणार असून याची निर्मिती पुणे महापालिकेने तसेच रेडिओ एफटीआयआयने केलेली आहे.

 

या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण रेडिओ एफटीआयआय 90.4 एफ.एम.वरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा विनामूल्य असून "प्रथम येईल त्याला प्राधान्य" या तत्त्वावर असून प्रवेश मर्यादा फक्त 10 जागांची आहे. अशा कार्यशाळेचे रेडिओ माध्यमाद्वारे थेट प्रक्षेपण हे याचे वेगळेपण आहे. या कार्यशाळेकरिता [email protected] या ई-मेल वर किंवा 9423007993 वर संपर्क साधावा, असे आवाहन रेडिओ एफटीआयआयतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.