तळवडेत बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

 
एमपीसी न्यूज – भरधाव बसने जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) सकाळी दहाच्या सुमारास ज्योतीबानगर, तळवडे येथे घडली. 

श्याम दौंडकर (वय 30, रा. रामनगर, चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम दौंडकर हे दुचाकीवरुन (MH 14, CP 005) शनिवारी सकाळी ज्योतीबानगर येथून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात बसने त्याला जोरात धडक दिली. बसचे चाक दुचाकीस्वाराच्या डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

अपघातानंतर बसचालकाने घटनास्थळी न थांबता पोबारा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील महापालिकेच्या (वायसीएम) रुग्णालयात नेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.