पुणे मॅग्निशियन संघाचा दणदणीत विजय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेत पुणे मॅग्निशियन संघाने विक्रांत वॉरीयर्स संघाचा 9-0, असा दणदणीत पराभव करून विजयी सलामी दिली.

पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सुरू असलेल्या स्पर्धेत आज झालेल्या सामन्यामध्ये पुणे मॅग्निशियन संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवले. चौथ्याच मिनिटाला महिंद्र चाकलेयाने पहिला गोल केला. पवन रसाळ यानेदोन गोल केले. तसेच जय काळे यानेही दोन गोल केले. रिझवान शेख ओंकार मुसळे, अनुप लाकरेव अतुल कलाटेयांनी प्रत्येकी एकेक गोल केले.

स्पर्धेचा निकालः 1) पुणे मॅग्निशियनः 9 (महिंद्र चाकले 4 मि., पवन रसाळ 18, 49 मि., रिझवान शेख 22 मि., जय काळे 26, 48 मि., ओंकार मुसळे 40 मि., अनुप लाकरे 41 मि., अतुल कलाटे 51 मि.) वि.वि. विक्रांत वॉरीयर्सः 0;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.