रंग व पिचका-यांनी सजल्या पुणे, पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठा

एमपीसी न्यूज – होळी आणि धुलिवंदनाचा सण दोन दिवसावर आल्याने बाजारपेठ आकर्षक पिचकाऱ्या व अनेक प्रकारच्या रंगाने सजली आहे. परिसरात विविध पिचकर्‍यांची दुकाने थाटली आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या पिचका-याच्या किंमतीत 20 ते 25 रुपयांनी वाढ झाली आहे. मागच्या वर्षी 30 रुपयांना मिळणारी पिचकारी आता 50 रुपयांना मिळत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बच्चेकंपनीकरिता बाजारात छोटा भीम, वॉटर गन, वॉटर टँक, डोरेमॉम, सिंह, हत्ती, वाघ, क्रिश, अशा पिचकऱ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. कार्टून्स असलेल्या पिचकाऱ्यांना जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दहा रुपयांपासून ते एक हजार रुपये किमतीच्या पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध आहेत. पिचकाऱ्यासह विविध प्रकारचे रंग बाजारात उपलब्ध आहेत.

गुलाबी, लाल, पिवळा, हिरवा आणि निळा, असे अनेक प्रकारचे नैसर्गिक रंग बाजारात तीस रुपयांपासून उपलब्ध आहे. यातील काही रंग 50 रुपयांपासून ते 250 किलोपर्यंत मिळतात. मात्र, किलोपेक्षा पॅकिंगमध्ये असलेल्या रंगांना जास्त मागणी आहे.  नैसर्गिक रंगांचा मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. नैसर्गिक रंगाच्या किंमतीही 20 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
"holi
"holi
"holi

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.