कामात त्रुटी हे आम्ही आजवर ऐकले आता तुम्ही सत्तेमध्ये आहात

महापौरांना राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नगरसेवकांनी सुनावले
एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेत आज नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सर्व साधारण सभा पार पडली. या दरम्यान महापौरपदी मुक्ता टिळक आणि उपमहापौरपदी नवनाथ कांबळे यांची निवड झाली. या निवडीनंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत आम्ही सत्तेत असताना कामात पारदर्शकता पाहिजे. या कामात त्रुटी आहेत हे आम्ही ऐकत होतो. आता तुम्ही सत्तेमध्ये आहात तुमचे शब्द लक्षात ठेवा. अशा शब्दात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौराना पहिल्याच सभेत सुनावले.
पुणे महानगरपालिकेत आज झालेल्या सर्व साधारण सभेवेळी माधूरी सहस्त्रबुद्धे, अविनाश बागवे, मुरली मोहोळ, नाना भानगिरे, मंगला मंत्री, चंचला कोद्रे, हेमंत रासने, विशाल धनवडे, वैशाली बनकर, सुनिल कांबळे, वसंत मोरे, धीरज घाटे, रेश्मा भोसले, डॉ. सिद्धार्थ धेंडे आदींची भाषणे झाली.त्यांनी यावेळी जुन्या आठवणीना उजाळा देखील दिला. तर या पुढील काळात सभागृहात कशा प्रकारे काम झाले पाहिजे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.
यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले की, भाजपाला सत्ता मिळाली, तुम्ही महापौर झालात याचा आनंद आहे, पण महापालिकेत आज विनापरवाना फ्लेक्स लावले, इमारतीवर विद्यूत रोषणाई केली, रांगोळी खराब होईल म्हणून सुरक्षा रक्षक आमची गाडी आत सोडेनात, हा काय प्रकार आहे? हे योग्य नाही. महापालिकेची मालकी तुमच्याकडे आलेली नाही. कारभारी बदलला आहे. मुंबईत तुम्ही शिवसेनेला आम्ही पहारेकरी राहू असे बजावले आहे. मी तसे सांगणार नाही, तुमच्याबरोबरच राहू, पण अयोग्य करत असाल तर ते सांगण्याची खबरदारीही घेऊ.
काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे म्हणाले, आम्ही सत्तेमध्ये अनेक शब्द ऐकून घेतले असून आता तुम्ही सत्तेमध्ये आहात.त्यामुळे चांगले काम करण्याची अपेक्षा आहे. जर तुमच्या कामात चुक दिसल्यास ती दाखवून देऊ आणि त्यावर आवाज उठवू. असे सांगत ते म्हणाले की, तुमच्या बरोबर रिपाइ असल्याने तुमची सत्ता आली आहे हे तुमच्या लक्षात असू द्या असा चिमटा ही त्यांनी लगावाला.
सभागृह नेते भिमाले म्हणाले,पुणे शहराच्या विकास कामा बाबत कोणत्याही प्रकारचे कधी ही राजकारण खेळणार नसून सर्व पक्षीय नगरसेवकांना बरोबर घेऊन काम करणार आहोत असे सांगत ते पुढे म्हणले की, अभिनंदनाच्या भाषणात राजकारण आणू नये असा संकेत असताना. देखील सहकारी मित्रांनी यावेळी राजकारण आणले काही हरकत नाही.अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले.
यावेळी नवनिर्वाचित महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, आजवर केलेल्या कामाच्या जोरावर महापौर पदाची जबाबादारी पक्षांनी दिली असून या पुढील काळात शहराच्या विकासाचे निर्णय घेतले जाईल. तसेच विकासासाठी निधी लागतो. तो मिळवताना काही कठोर निणर्य घ्यावे लागतील,मात्र कडू औषधानेच रोग बरा होतो.असा प्रत्येक्ष टोला त्यांनी विरोधकांना लगावला.