स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारवाड्यावर देशभक्ती पर्व

 

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अभूतपूर्व जल्लोष, शहीद जवानांना सलामी, हम सब एक है तसेच भ्रष्टाचार, जातीवाद, दहशतवाद मुक्त भारताचा नारा देत देशभक्ती पर्व साजरे करण्यात आले.

स्वातंत्र्यासाठी लढलेल्या जवानांना सलामी देऊन भारताचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडे ठाकलेल्या जवानांना नमन करत कार्यक्रम पार पडला. यावेळी अरिहंत ग्रुपचा दिमाखदार ढोल ताशा, देशभक्ती संगीत, नाझ डान्स ग्रुपचा भारत माता की जय डान्स शो, मनीषा साबळे ग्रुपचा आत्मरक्षण, कराटे, मार्शल आर्टस् शो, नू म विचे शल्य विद्यार्थी यांचे देशभक्ती गीत व कला नृत्य या कार्यक्रमांनी उपस्थितांच्या हृदयात देशभक्तीची मशाल पेटविली. डॉ. अश्विनी रानडे यांच्या वंदे मातरम् गीताला मोठा प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रनिष्ठेची शपथ घेऊन युवकांना देशहितासाठी एकजूट राहण्याचा संदेश यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी दिला. चीन व पाकिस्तान भारतावर युद्ध लादत असून त्याचा मुकाबला करण्यासाठी आपण भारतीय सैनकांना सलामी देऊ तसेच चिनी वस्तूवर बहिष्कार टाकून आपणही देशासाठी अंतर्गत लढा देत असल्याचे दाखवून देऊ, असा संदेश महापौर टिळक यांनी दिला.

सन 1971 साली झालेल्या लढाईत लढलेले निवृत्त कर्नल संभाजी पाटील यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. कर्नल पाटील म्हणाले की, भारताच्या सीमेवर जे सैनिक आपले रक्षण करण्यासाठी खडे ठाकले आहेत. त्यांना देशातील प्रत्येक नागरिकाकडून अंतर्गत शांतता ठेवून त्यांना शत्रूशी लढण्यासाठी बळ देण्याची अपेक्षा असते.

बापूसाहेब भोसले म्हणाले की, सर्वांनी आता आतंकवाद संपवण्यासाठी मोहिमा उघडल्या पाहिजे. चिनी वस्तूंवर बहिष्कार करत आपणही देशहितासाठी संघर्ष करीत असल्याचे दाखवून दिले पाहिजे. युवक व विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची बिजे रोवण्यासाठी देशभक्ती पर्वासारखे कार्यक्रम झाले पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.