Pune : पूरबाधित कुटुंबांना 25 हजार रुपये मदत द्यावी; राष्ट्रवादीची मागणी

एमपीसी न्यूज – पूरबाधित प्रत्येक कुटुंबांना २५ हजार रुपये मदत द्यावी, नदीकाठच्या झाेपडीधारकांना झाेपडपट्टी पुनवर्सन याेजनेत घर द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने महापािलका आयुक्त साैरभ राव यांच्याकडे करण्यात आली आहे.  
पक्षाचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक चेतन तुपे, माजी आमदार बापू पठारे, नगरसेवक सुनील टिंगरे आदींनी आयुक्त राव यांची भेट घेऊन वरील मागण्या केल्या आहेत. यानंतर पत्रकार परिषदेत महापािलकेने पुरबाधितांकरिता काेणतीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही, असा आरोप तुपे यांनी केला. महापालिकेने केवळ शाळांमध्ये या रहिवाशांना स्थलांतरीत केले. पण त्यांच्या भाेजन, दैनंदिन गरजांच्या संदर्भात काेणतीही मदत केली नसल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे विश्रांतवाडी भागातील इंदिरानगर, शांतीनगर आदी भागातील पुरबाधितांना जेवण देण्यात आल्याचे ते म्हणाले.
या पुरबाधितांना तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये आणि घर दुरुस्तीसाठी सहा हजार रुपये इतकी मदत देण्याची तरतूद आहे. परंतु ही तरतूद वाढविण्याची आवश्यकता आहे. या पुरबाधितांना २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे तुपे यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.