Moshi : मोशी, चाकण, वाकडमधून तीन दुचाकी चोरीला

3-two-wheelers-were-stolen-from-moshi-chakan-and-wakad area of Pimpri Chinchwad

एमपीसी न्यूज – मोशी चाकण आणि वाकड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत शनिवारी (दि. 16) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विनोद पांडुरंग मदने (वय 37, रा. घरकुल चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी मदने यांनी 10 मे रोजी सकाळी साडेआठ वाजता त्यांची दहा हजार रुपये किमतीची एम एच 12 / जी एच 8239 दुचाकी बोर्‍हाडेवाडी, मोशी येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

प्रशांत साहेबराव येळवंडे (वय 29, रा. निघोजे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची एम एच 14 / ए सी 2146 दुचाकी शुक्रवारी रात्री घरासमोर पार्क केली होती.

रात्री अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्याने दुचाकी चोरून नेली. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

सुलोचना तेजराज काळे (वय 35, रा. काळेवाडी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी काळे यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीचे एम एच 12 / डी व्ही 4322 दुचाकी त्यांच्या घरासमोर पार्क केली होती.

अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.