पिंपरीत भाजपला 37 टक्के तर राष्ट्रवादीला 28 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 37. 06 टक्के मतदान झाले आहे. तर, सत्ताधारी राष्ट्रवादीला 28. 56 टक्के मतदान झाले आहे. 37.06 टक्के मते घेऊन भाजपने 77 जागा जिंकत महापालिका ताब्यात घेतली आहे.

पक्ष

मिळालेली एकूण मते

मतांची टक्केवारी

जागा

जागांची टक्केवारी

भाजप

11,53,060

37.06%

77

60.15

राष्ट्रवादी

08,88,659

28.56%

36

28.13

शिवसेना

05,16,721

16.61%

9

7.03

मनसे

00,42,990

1.38%

1

0.78

काँग्रेस

00,97,063

3.12%

0

अपक्ष

02,67,229

8.59%

5

0

नोटा

00,87,773

2.82%

3.91

इतर

00,58,153

1.86%

31,11,648

100.00%

128

100

 

पिंपरी-चिंचवड शहरात 11 लाख 92 हजार 89 मतदार आहेत. त्यापैकी 7 लाख 79 हजार 060 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी प्रभाग पद्धतीने निवडणूक झाल्यामुळे एका मतदाराला चार मते करण्याचा अधिकार होता. भाजपला 11 लाख 53 हजार 060 मते मिळाली आहेत. त्यांची टक्केवारी 37.06 टक्के होत आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला 8 लाख 88 हजार 659 मते मिळाली आहेत. त्यांची मतांची टक्केवारी 28. 56 टक्के होत आहे. शिवसेनाला 5 लाख 16 हजार 721 मते मिळाली असून त्याची टक्केवारी 16.61 होत आहे.

 

मतदारांची पसंती कमळाला होती. 37. 06 टक्के मते भाजपला मिळाली असून त्यांचे 77 नगरसेवक निवडून आले आहेत. दोन नंबरची मते सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहेत. 36 नगरसेवक त्यांचे निवडून आले आहेत. शिवसेना तिस-या क्रमांकावर असून त्यांना 16.61 टक्के एवढी मते मिळाली आहेत. एवढी मते मिळूनही शिवसेनेचे नऊच उमेदवार निवडून आले आहेत. अपक्षांना 2 लाख 67 हजार 229 मते मिळाली आहेत. त्यांच्या मतांची टक्केवारी 8.59 टक्के होत आहे. पाच अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसला 97 हजार 063 मते मिळाली असून 3.12 टक्के मते होत आहेत. तीन टक्के मते मिळाली असतानाही काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. यावेळी मतदारांनी तब्बल 87 हजार 773 मते ‘नोटा’ला दिली आहेत. त्याची टक्केवारी 2.82 होत आहे.

 

पिपंरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 2007 ला 56.66 टक्के, 2012 मध्ये 54.84 टक्के मतदान झाले होते. यंदा प्रथमच महापालिकेच्या मताची टक्केवारी वाढली असून 65.47 टक्के मतदान झाले आहे. मतांची वाढती टक्केवारी आणि नव मतदारांची नोंदणी राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरली आहे. तर, मतांची वाढती टक्केवारी आणि नव मतदारांचा भाजपला फायदा झाल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.