पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या 42 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त

774 उमेदवारांपैकी 419 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूकांचा नुकताच निकाल लागला. यामध्ये  अनेक राजकीय पक्षांची गणिते चुकली ज्यामुळे मी-मी म्हणणारे उमेदवारही तोंडघशी पडेल. या हार-जितनंतर सर्वांचे लक्ष लागते ते कोणत्या उमेदवाराची अनामत रक्कम म्हणजे डिपॉझीट जप्त होते याच्याकडे. यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेनेच्या 115 उमेदवारांपैकी 42 उमेदवारांचे  डिपॉझीट जप्त झाले आहे.

यावेळी पिंपरी महापालिकेसाठी एकूण 774 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभारले होते. त्यापैकी 419 उमेदवारांचे  डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये शिवसेनेचा जो पिंपरी-चिंचवड मधील प्रबळ पक्ष म्हणून ओळखला जातो, त्याच पक्षाचे केवळ 9 उमेदवार विजयी झाले आहेत तर त्यांच्या 42 उमेदवारांचे डिपॉझीट  जप्त झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका प्रबऴ उमेदवार शारदा बाबर यांचेही डिपॉझीट जप्त केले आहे. तर प्रभाग क्रमांक नऊ मधील शिवसेनेच्या पॅनलचेच डिपॉझीट जप्त झाले आहे.


मनसे उमेदवार अव्वल तर काँग्रेसचा दुसरा नंबर

यामध्ये मनसेचे एकूण 43 उमेदवार रिंगणात होते त्यापैकी 25 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे. तर काँग्रेसचे 80 उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी उभारले होते त्यापैकी 42 उमेदवरांचे डिपॉझीट जप्त झाले आहे. काँग्रेसनंतर  यामध्ये राष्ट्ररवादीचाही समावेश असून राष्ट्रवादीच्या 124 उमेदवरांपैकी 4 उमेदवरांचे डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे. तर महापालिकेमध्ये घवघवीत यश मिळवणा-या भाजपच्या एकाही उमेदवराचे डिपॉझीट यावेळी जप्त झालेले नाही.

डिपॉझीट जप्त झालेल्यांमध्ये शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका शारदा बाबर, सुजाता टेकवडे यांचा समावेश आहे तर माजी नगरसेवकांमध्ये शिवसेनेच्या विजया जाधव, राष्ट्रवादीचे सतिश दरेकर, माजी विधी समिती सभापती विजय कापसे,  राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेच्या शहराध्यक्षांच्या पत्नी सुप्रीया गव्हाणे,  महापालिकेचे निवृत्त अधिकारी  सुभाष माछरे, तसेच राष्ट्रवादीचे निलेश गांगार्डे यांचा समावेश आहे.

वरील आकडेवारीचा विचार केला असता  प्रभाग क्रमांक 19 मधून सर्वाधीक म्हणजे 31 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे.त्याबरोबर प्रभाग 13 मधून 30 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे.  तीन नगरसेवकांच्या संख्याबळावरुन 77 पर्यंत पोहचलेल्या भाजपच्या एकाही उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले नाही. राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस या पक्षांना यातून आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.