Pune : ‘सोलारीस-रावेतकर करंडक’ जिल्हास्तरीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत 450 खेळाडूंचा सहभाग !

अर्जुन खानविलकर, अक्षय घैसास, मानस भावे, सोहम खुरपडे यांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !

एमपीसी न्यूज – सोलारीस क्लबतर्फे आयोजित सोलारीस-रावेतकर करंडक जिल्हास्तरीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत अर्जुन खानविलकर, अक्षय घैसास, मानस भावे आणि सोहम खुरपडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा संघर्षपूर्ण पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला.

सोलारीस क्लबच्या मयुर कॉलनी येथील बॅडमिंटन कोर्ट येथे स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन सोलारीसचे संचालक जयंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोलारीसचे सीईओ हृषीकेश भानूशाली, क्लबच्या बॅडमिंटन प्रशिक्षक व स्पर्धा संचालक राजश्री वाळींबे, क्लबचे व्यवस्थापक राजेश सपकाळ आदि उपस्थित होते.

11 वर्षाखालील गटात अर्जुन खानविलकर याने अर्णव क्षीरसागर याचा 13-15, 15-13, 15-12 असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली. अक्षय घैसास याने अव्दैत अभ्यंकर याचा 15-12, 09-15, 15-4 असा पराभव करून आगेकूच केली.

मानस भावे याने आरीष कवठेकर याचा 14-15, 15-07, 15-6 असा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. सोहम खुरपडे याने श्‍लोक मेधी याचा 12-15, 15-6, 15-10 असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकालः मुख्य ड्रॉः

11 वर्षाखालील मुलेः पहिली फेरीः
नील जोशी वि.वि. तन्मय कुलकर्णी 15-11, 15-5;
अर्जुन खानविलकर वि.वि. अर्णव क्षीरसागर 13-15, 15-13, 15-12;
अक्षय घैसास वि.वि. अव्देत अभ्यंकर 15-12, 09-15, 15-4;
मानस भावे वि.वि. आरीष कवठेकर 14-15, 15-07,15-6;
कोर्णाक इंचेकर वि.वि. हर्ष क्षीरसागर 15-7, 15-2;
निलय काळे वि.वि. शिवराज मोहोळ 15-3, 15-7;
आदित्य पर्वते वि.वि. त्रुशांक दांडेकर 15-6, 15-2;
आर्यन बागल वि.वि. रूचिर मांडे 15-10, 15-12;
सोहम खुरपडे वि.वि. श्‍लोक मेधी 12-15, 15-6, 15-10;
तनिष्क अडे वि.वि. प्रदुम्न काळेकर 15-10, 15-5;
ओजस सोरटे वि.वि. रूद्रनील नाडगोंडे 15-0, 15-1;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.